ब्रिटनच्या पंतप्रधानांची प्रकृती खालावली, आयसीयूमध्ये दाखल


लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची प्रकृती बिघडल्यामुळे सोमवारी त्यांना उशिरा आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. रूटीन चेकअपसाठी ते रुग्णालयात गेले असता तब्येत बिघडल्यामुळे त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. 10 दिवसांपूर्वीच कोरोनामुळे बोरिस जॉन्सन हे ग्रस्त असल्याची पुष्टी झाली आणि त्यानंतर त्यांना डाउनिंग स्ट्रीटमध्ये वेगळे ठेवण्यात आले. ते त्या ठिकाणाहूनच आपले काम करीत होते आणि देशात राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीवर लक्ष ठेवत होते. सध्या पंतप्रधान जॉन्सन यांच्या जागी परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब कामावर देखरेख ठेवतील.

वैद्यकीय चाचणीसाठी बोरिस यांना रुग्णालयात नेण्यात आले होते, जे त्यांनी स्वतः ट्विटरवर स्पष्ट केले होते. जॉन्सन यांनी लिहिले, रविवारी मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रूटीन चेकअपसाठी रूग्णालयात गेलो. कारण मला आजही कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत. माझ्या टीमशी मी संपर्कात आहे, या व्हायरसशी आपण एकत्र लढा देऊ आणि सर्वांना सुरक्षित ठेवू. त्याचबरोबर त्यांनी आणखी एक ट्विट केले होते, या एनएचएसच्या सर्व स्मार्ट कर्मचार्‍यांचे मला आभार मानायचे आहेत. या कठीण अशा काळात जे माझी आणि इतरांची काळजी घेत आहेत. कृपया सर्व सुरक्षित रहा आणि एनएचएस आणि जीवन वाचवण्यासाठी घरात रहा.

ब्रिटीश पीएमओनेही रविवारी ट्विट केले होते. ब्रिटीश पीएमओनेही अशी माहिती दिली होती की, आपत्कालीन परिस्थिती नसली तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि बोरिस जॉन्सन हे सरकारचे एकुलते प्रमुख आहेत. पीएमओने त्यास खबरदारीचे पाऊल म्हटले आहे. ब्रिटीश पंतप्रधानांनी एकाकीपणाच्या वेळी आपले आवश्यक काम सुरू ठेवले होते आणि अनेक व्हिडिओ संदेशही दिले होते. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओ संदेशात 55 वर्षीय जॉन्सन यांनी जनतेला सांगितले की त्यांना पूर्वीपेक्षा बरे वाटू लागले आहे.

बोरिस जॉन्सनच्या स्वास्थ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान बोरिस जॉन्सन निश्चिंत राहा. मला आशा आहे की, तुम्ही लवकरच बरे व्हाल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, मोदी मित्र राष्ट्रांच्या प्रमुखांशी सतत संपर्कात असतात आणि कोरोना विषाणूविरूद्ध लढ्यात समर्थन देत आहेत.

पंतप्रधान जॉन्सन यांची गर्भवती पत्नी कॅरी सायमंड्सनेही स्वत: ला क्वारंटाईन ठेवले आहे. याबाबतची माहिती देताना रविवारी ते म्हणाले की, कोरोना विषाणूचीही लक्षणे त्यांच्यामध्येही आहेत. त्या याक्षणी विश्रांती घेत आहे आणि पूर्वीपेक्षा त्यांची प्रकृती चांगली आहे. कॅरीने गर्भवती महिलांसाठीदेखील माहिती शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की, गरोदरपणा आणि कोविड -19 चिंताजनक आहे. इतर गर्भवती स्त्रिया कृपया नवीनतम मार्गदर्शक तत्त्वे वाचा आणि त्याचे अनुसरण करा. ज्या मला अगदी योग्य वाटल्या.

Leave a Comment