देशात 4421 कोरोनाग्रस्त; तर आतापर्यंत 114 लोकांचा मृत्यू


नवी दिल्ली : आपल्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस फोफावत चालला असून दरम्यान आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 4421 वर जाऊन पोहोचला आहे. त्यातील 3851 सक्रिय रूग्ण असून त्यापैकी 1445 रूग्ण हे तबलिगींच्या धार्मिक कार्यक्रमातील असून काही त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या रूग्णांपैकी 76 टक्के पुरूष आणि 24 टक्के महिला आहेत.

देशात कोरोनामुळे आतापर्यंत 114 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसच्या रूग्णांचे आकडे आरोग्य मंत्रालयाने सर्वांसमोर जाहीर केले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 63 टक्के मृत्यू 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींचे झाले आहेत. तर 30 टक्के मृत्यू हे 40 ते 60 दरम्यान वय असणाऱ्या लोकांचे झाले आहेत. तर 7 टक्के कोरोनाग्रस्त हे 40 पेक्षा कमी वयाचे आहेत.

आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरससाठी 5 लाख टेस्टिंग किटची ऑर्डर देण्यात आली आहे. 8-9 एप्रिलला 2.5 लाख किट डिलिव्हर होणार आहेत. तबलिगी जमातीच्या लोकांबाबत एक महत्त्वाची माहिती गृह मंत्रालयाने दिली आहे. मंत्रालयातील संयुक्त सचिव श्रीवास्तव यांनी सांगितले की, 25000 पेक्षा जास्त तबलिगी जमातीच्या लोकांना तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांना आम्ही क्वॉरंटाईन केले आहे. हरियाणाच्या ज्या 5 गावांमध्ये ते गेले होते. ते सील करण्यात आले आहे.

Leave a Comment