काय आहे कोरोना आणि 5जी कॉन्सपिरेंसी थेअरी ?

कोरोना व्हायरसबाबत जगभरात अनेक कॉन्सपिरेंसी (कट) थेअरी सुरू आहेत. काहींच्या मते हे बायो शस्त्र आहे जे चीनने बनवले आहे. तर काहींच्या मते हे 5जीमुळे होत आहे. अनेक ठिकाणी 5जीच्या कॉन्सपिरेंसी थेअरीवर अधिक विश्वास केला जात असून, युट्यूबर या संदर्भातील शेकडो व्हिडीओ आहेत.

गार्डियनच्या एका रिपोर्टनुसार, मागील आठवड्यात ब्रिटनच्या बर्मिंघम येथे काही लोकांनी 7 मोबाईल टॉवर्सला आग लावली. याशिवाय ब्रॉडबँड इंजिनिअर्ससाठी देखील अपशब्द वापरले. एवढेच नाहीतर त्यांना धमकी देखील देण्यात आली.

काय आहे कोरोना आणि 5जी कॉन्सपिरेंसी थेअरी ?

सोशल मीडियावर मेसेज व्हायरल होत आहेत की 5जी मुळे कोरोना व्हायरस पसरत आहे. 2019 पासून मोठ्या प्रमाणात 5जीची चाचणी सुरू झाली आहे.

या दोन वेगवेगळे गट आहेत. काहींनुसार, 5जी मुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते व यामुळे व्हायरसचा संसर्ग लवकर होतो. तर दुसऱ्या गटानुसार, 5जी टेक्नोलॉजीमुळे व्हायरस ट्रांसमिट होतो. थोडक्यात, काही लोकांचा विश्वास आहे की, 5जी सिग्नलमुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे.

यात सत्य किती ?

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, सेल्युलर मायक्रोबायोलॉजीच्या असोसिएट प्राध्यापक डॉ. सिमॉन क्लार्क यांचे म्हणणे आहे की, या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. 5जी मुळे लोकांच्या रोगप्रतिकाराक शक्तीवर परिणाम होतो, असे म्हणणे देखील चुकीचे आहे. अनेतॉक तज्ञ व वैज्ञानिकांनी देखील यात काहीच तथ्य नसल्याचे म्हटले आहे. आतापर्यंत असे काहीच समोर आलेले नाही, जे सिद्ध करेल की 5जी मुळे कोरोना व्हायरसचा प्रसार होतो.

Leave a Comment