व्हायरल झालेले ते पत्रक फेक, जागतिक आरोग्य संघटनेचे स्पष्टीकरण


नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) नावाने एक पत्रक गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या पत्रकामध्ये भारतातील लॉकडाऊनसाठी प्रोटोकॉल लावण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या नावाने पसरवण्यात आलेल्या या पत्रकामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने भारतामध्ये सर्वात घातक कोरोना व्हायरस रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये प्रोटोकॉल ठरवले आहेत. त्याचबरोबर दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात येणार असल्याचेही यामध्ये सांगण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने व्हायरल होणाऱ्या या पत्रकाबाबत आता स्पष्टीकरण दिले असून व्हायरल होत असेलेल फेक असल्याचे सांगितलं आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने असे कोणतेही पत्रक काढून कोणत्याही प्रकारचे आदेश दिले नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. सोशल मीडियावर लॉकडाऊनबाबत जागतिक आरोग्य संघटनेचा आदेश म्हणून जो मेसेज व्हायरल होत आहे, तो फेक असून जागतिक आरोग्य संघटना लॉकडाऊनसाठी कोणताच प्रोटोकॉल ठरवलेला नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment