कोरोना : घरच्या घरीच तयार करा असा मास्क

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने लोकांना मास्क घालण्यास सांगितले आहे. बाजारात मास्कचा तुटवडा जाणत असल्याने लोक घरी तयार केलला मास्क देखील घालू शकतात. गर्दीच्या ठिकाणी मास्क घातल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत मिळू शकते.

अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, घरी मास्क बनविल्याने स्वच्छ ठेवण्यास देखील मदत होते. दोन मास्क असल्याने एक मास्क धुतल्यास, दुसरा वापरता येतो. घरातील कोणत्याही कापडापासून तुम्ही सहज मास्क बनवू शकता. हा मास्क चेहरा व नाक पुर्णपणे झाकणारा असावा.

असा तयार करा मास्क –

मास्क तयार करण्यासाठी तुमच्याकडे ए4 आकाराचे कापड, सुई धागा, रबर बँड असणे गरजेचे आहे. घरात पडलेल्या कपड्यातून चौरस आकाराचे कापड (सुमारे 7 ते 8 इंच) कापून घ्या. यानंतर कापडाच्या डाव्या व उजव्या बाजूला रबर बँड लावून शिवून घ्या.

लक्षात ठेवा की दोन रबर बँडमधील भाग तोंड आणि नाक झाकण्यासाठी पुरेसे आहे. रबर बँड लावून चारही बाजू व्यवस्थित शिवून घ्या. यानंतर तुमचा मास्क तयार होईल.

Leave a Comment