कोरोना : हॉस्पिटलमधून पळून जाण्याचा प्रयत्न संशयिताच्या जीवावर बेतला

हरियाणाच्या कर्नाल येथील हॉस्पिटलमधून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका कोरोना संशयिताचा मृत्यू झाला आहे. हा कोरोना संशयित हॉस्पिटलच्या 6व्या मजल्यावरून खिडकीतून खाली उतरण्याचा प्रयत्न करत होता.

कर्नाल येथील कल्पना चावला मेडिकल कॉलेजच्या 6 व्या मजल्यावरून हा कोरोना संशयित सकाळी  4 वाजता पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तो खिडकीतून खाली पडला. व्यक्तीने बेडशीट आणि प्लास्टिक पॅकेटद्वारे दोरी बनवली होती व त्याच्या साहय्यानेच तो खाली उतरण्याचा प्रयत्न करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मूळचा पानिपत येथील असलेल्या या व्यक्तीला 1 एप्रिल रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. व्यक्तीला अनेक आजार होते. डॉक्टरांनुसार, कोरोनाचे कोणतेही लक्षण नसताना व्यक्तीला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्या रक्ताच्या चाचणी रिपोर्ट अद्याप आले नव्हते.

या घटनेमुळे आयसोलेशन वॉर्डच्या सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण झाले आहेत.

Leave a Comment