कोरोना : पीएम केअर्समध्ये मदत करताना घ्या काळजी, अन्यथा खाते होईल रिकामे

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विशेष सहाय्यता निधीसाठी पीएम केअर्समध्ये दान करण्यास सांगितले. पीएम केअर्समध्ये जमा झालेल्या रक्कमेचा वापर कोरोनाशी लढण्यासाठी केला जाणार आहे.

जर तुम्ही देखील या दान करू इच्छित असाल, तर विशेष काळजी घ्या. अन्यथा तुमचे खाते रिकामे होऊ शकते. कारण, सध्या कोरोना व्हायरसच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक मोठ्या प्रमाणात वाढली असून, एकट्या महाराष्ट्रात सायबर पोलिसांनी 78 अशा तक्रारी दाखल केल्या आहेत.

नईदुनियाने दिलेल्या वृत्तानुसार, जर पीएम केअर्समध्ये दान करत असाल, तर तुमची रक्कम योग्य खात्यात जात आहे की नाही हे तपासा. पीएम केअर्समध्ये यूपीआयच्या माध्यमातून रक्कम देण्यासाठी एकमेव आयडी ‘pmcares@sbi’ हा आहे. हा आयडी सरकारद्वारे जारी करण्यात आलेला आहे. जर तुम्हाला दुसऱ्या आयडीवर पेमेंट करण्यास प्रेरित केले जात असेल, तर सावध व्हा.

सायबर ठगांनी पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि येस बँकेत बनावट यूपीआय आयडी तयार केले आहेत. हे बनावट आयडी ‘पीएमकेअर’ आणि ‘पीएमकेअर्स’ नावाने आहेत. नावात साम्य असल्याने अनेक जणांची फसवणूक होत आहे.

हे सर्व आयडी खोट –

pmcare@sbi, pmcares@pnb, pmcares@hdfcbank, pmcare@yesbank, pmcare@ybl, pmcare@upi, pmcare@icici

सरकारच्या सायबर सुरक्षा नियमाकने सांगितले की, रक्कम ट्रांसफर करताना निश्चित करा की रजिस्टर्ड अकाउंट नावाच्या येथे ‘PM Cares’ हेच नाव दिसत आहे. जर अन्य नाव दिसत असेल, तर तो आयडी बनावट आहे.

Leave a Comment