रक्ताच्या एका थेंबाने 30 मिनिटात होणार कोरोनाची पुष्टि

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने (आयसीएमआर) कोव्हिड-19 शी लढण्यासाठी वेगाने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. आयसीएमआरने आता रॅपिड अँटीबॉडी ब्लड टेस्टसाठी दिशा-निर्देश जारी केले आहेत. या संदर्भात अमर उजालाने वृत्त दिले आहे.

परिषदचे अध्यक्ष डॉ. बलराम भार्गव यांनी सरकारला पत्र लिहून राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना ही चाचणी लवकरात लवकर सुरू करण्यास सांगितले आहे. या चाचणीमुळे 15 ते 30 मिनिटात परिणाम समोर येतील.

ज्या क्षेत्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे, तेथे आरोग्य विभाग विशेष लक्ष देईल. संक्रमण दर वाढला तर याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि विशेष अधिकाऱ्याला द्यावी लागली.

रक्ताच्या एका थेंबाद्वारे ही तपासणी शक्य आहे. या चाचणीद्वारे समजेल की व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही. हे किट सध्या आयसीएमआरद्वारे निश्चित चाचणी केंद्रावरच मिळेल.

Leave a Comment