कोट्यावधी लोकांनी केला MyGov कोरोना हेल्पडेस्क चॅटबॉटचा वापर

केंद्र सरकारने लोकांपर्यंत कोरोना व्हायरसची योग्य माहिती पोहचण्यासाठी माय गव्ह कोरोना हेल्पडेस्क चॅटबॉट लाँच केले होते. या चॅटबॉटला आतापर्यंत तब्बल 2 कोटी लोकांनी वापरले आहे. या बाबतची माहिती हेप्टिकने दिली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर काम करणाऱ्या या चॅटबॉटला हेप्टिकनेच तयार केले आहे. या कंपनीची 87 टक्के भागीदारी रिलायन्स जिओकडे आहे.

हेप्टिकने अधिकृत ट्विटर हँडलद्वारे ट्विट केले की, या चॅटबॉटला 20 मार्चला लाँच करण्यात आले होते. आतापर्यंत 2 कोटी लोकांनी याचा वापर केला आहे. लोक या चॅटबॉटद्वारे कोव्हिड-19 संदर्भात योग्य माहिती मिळवत आहेत.

जर तुम्हाला देखील या चॅटबॉटचा वापर करायचा असल्यास 9013151515  या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर मेसेज करू शकता. मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला हेल्पलाईन नंबर असलेला मेसेज येईल. सोबतच कोरोना संदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील.

दरम्यान, सरकारने काही दिवसांपुर्वी कोरोना व्हायरस ट्रॅकिंग अ‍ॅप आरोग्य सेतूला देखील लाँच केले आहे. युजर्स कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आले आहेत की नाही याची माहिती हे अ‍ॅप देईल.

Leave a Comment