काळजात धडकी भरवणारे जगभरातील कोरोनाचे आकडे


नवी दिल्ली : जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात लक्षणीय वाढ होत असून तब्बल 12 लाखांहून अधिक जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर 69 हजार जणांना कोरोनाच्या संसर्गामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत तीन लाख 20 हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली असून 9 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान स्पेनमध्ये एकूण 1,31,646 कोरोनाग्रस्त आहेत. तर इटलीमध्ये 1,28,948 कोरोनाग्रस्त आहेत. आता स्पेन युरोपमधील कोरोनाचे केंद्र बनले आहे. जगभरातील एकूण आकड्यांमध्ये अमेरिकेनंतर स्पेन दुसऱ्या क्रमांकावर आहे.

वॉशिंग्टनमध्ये असलेल्या जॉन्स हॉपकिंस युनिवर्सिटीमध्ये सेंटर फॉर सिस्टम सायन्स अॅन्ड इंजिनिअरिंगने (सीएसएसई) दिलेल्या माहितीनुसार, सध्या एकूण 3,36,830 कोरोना बाधित अमेरिकेत आहेत. तर कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाले असून इटलीमधील मृतांचा आकडा 15,887 वर पोहोचला आहे. त्यानंतर स्पेनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 12,641 मृत्यू झाले आहेत.

Leave a Comment