केंद्र सरकारचा मोठा निर्णय! वर्षभरासाठी सर्व खासदारांची वेतन कपात


नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारने कोरोनाविरोधातील लढाईसाठी खासदारांच्या वेतनात ३० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

वेतन कपातीचा हा निर्णय आर्थिक वर्ष २०२०-२१ या वर्षासाठी घेण्यात आला असून या निर्णयाला कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याचेही प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले आहे. तूर्तास हा निर्णय १२ महिन्यांसाठी घेतला आहे. त्याचबरोबर या संदर्भातील अध्यादेशाला मंजुरी देण्यात आल्याचेही प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाशी लढता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment