पोलिसांच्या पत्नी देखील आल्या पुढे, वाटली 33000 जेवणाचे पाकिट आणि 800 मास्क

कोरोना व्हायरसमुळे संपुर्ण जग लॉकडाऊन झाले आहे. अशा स्थितीत गरजूंना मदत करण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत. अनेक कलाकार, खेळाडूंनी मदतीचा हात पुढे केला आहे. या कठीण परिस्थिती पोलीस देखील आपले कर्तव्य बजावत आहेत.

पंजाबच्या रोपर जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी देखील आपली सेवा बजावत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या पत्नी गरजूंना जेवण देत आहेत व अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी घरी मास्क तयार करत आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबाकडून तब्बल 33 हजार जेवणाचे पॉकिट्स झोपडपट्टी भागातील लोकांना वाटण्यात आल्याचे, रोपर येथील वरिष्ठ पोलिस अधीक्षक स्वप्न शर्मा यांनी सांगितले. याशिवाय 800 मास्क देखील प्रत्येक चेकपॉईंटवर वाटण्यात आले.

त्यांनी सांगितले की, प्रत्येक कुटुंबाने कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी 500 रुपयांची मदत केली आहे.

पोलीस कर्मचारी 14-16 तास लॉकडाऊनमध्ये काम करत असताना, त्यांचे कुटुंबीयही त्यांचे ओझे कमी करण्यासाठी मदत करत आहेत. सहाय्यक सब-इंस्पेक्टर जगतार सिंह यांच्या पत्नी सुखविंदर कौर म्हणाल्या की, या कठीण काळात वर्दीमध्ये काम करणाऱ्यांसाठी मास्क बनविण्यापेक्षा दुसरे अधिक चांगले काय असेल.

Goa sikh youth ki or se langar.jin logo tak nahi phucha langar un logo tak phuchya khana goa Sikh youth ne.kafi aisy log…

Posted by GOA SIKH YOUTH. on Thursday, April 2, 2020

दुसरीकडे, गोवा शीख यूथ कम्युनिटी देखील लॉकडाऊनच्या काळात गरजूंपर्यंत जेवण पोहचवत आहेत.

Leave a Comment