कोरोना : खाजगी हॉस्पिटलमध्ये ‘आयुष्मान’ योजनेंतर्गत होणार मोफत उपचार

भारतासह जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, दिवसेंदिवस भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे. आता या पार्श्वभुमीवर सरकारने स्पष्ट केले आहे की खाजगी लॅब आणि हॉस्पिटलमध्ये होणारी कोरोना चाचणी आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत केली जाईल. म्हणजेच या योजनेच्या लाभार्थींचा उपचार व चाचणी मोफत केली जाईल. सरकारी हॉस्पिटलमध्ये चाचणी आणि उपचार आधीपासूनच मोफत सुरू आहेत.

जवळपास 50 कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे. या योजनेच्या लाभार्थीमध्ये जर कोरोना व्हायरसचे लक्षण आढळले व एखाद्या खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्णाला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असल्यास, याचा खर्च आयुष्मान भारत योजनेंतर्गत मिळेल. खाजगी लॅबमध्ये ही चाचणी इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्चच्या दिशा-निर्देशांद्वारे केली जाईल.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, “या संकटाच्या काळाता कोरोना व्हायरस विरूद्धच्या  लढ्यात खासगी क्षेत्राला सक्रिय भागीदार म्हणून सहभागी करून घेणे आवश्यक आहे. आयुष्मान भारत योजनंतर्गत चाचणी आणि उपचार करण्यासाठी खाजगी हॉस्पिटल आणि लॅबचा समावेश केल्याने आपली क्षमता अधिक वाढेल व गरिबांवर या आजाराचा परिणाम कमी होईल.

दरम्यान, तेलंगाना, ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या सरकारने राज्यात आयुष्मान भारत योजना लागू केलेली नाही. तर दिल्ली सरकारने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये ही योजना लागू करणार असल्याचे सांगितले आहे.

Leave a Comment