कोरोना : या खास औषधासाठी ट्रम्प यांनी मोदींकडे मागितली मदत

कोरोना व्हायरसने महासत्ता असलेल्या अमेरिकेत देखील थैमान घातले आहे. येथे कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाखांवर पोहचला असून, शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभुमीवर अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा करत मदत मागितली आहे.

ट्रम्प यांनी मोदींशी कोरोनाशी लढण्यासाठी मदत मागितली आहे. या चर्चेत ट्रम्प यांनी मोदींकडे हायड्रोक्सी क्लोरोक्वीन गोळ्यांची निर्यात करण्याची विनंती केली आहे.

काय आहे हायड्रोक्सी क्लोरोक्वीन ?

भारतीय औषध कंपन्या मोठ्या प्रमाणात हायड्रोक्सी क्लोरोक्वीनचे उत्पादन करतात. मलेरियासारख्या धोकादायक आजारांशी लढण्यासाठी हायड्रॉक्सी क्लोरोक्विन प्रभावी औषध आहे. दरवर्षी भारतात मोठ्या प्रमाणात मलेरिया होतो, म्हणून भारतीय औषध कंपन्या मोठ्या प्रमाणात याचे उत्पादन करतात.

खास गोष्ट म्हणजे अमेरिका सारख्या देशांमध्ये कोरोनाग्रस्तांना हे औषध दिले जात असून, त्याचा चांगला परिणाम देखील पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे याची मागणी वाढली आहे. मात्र भारतात देखील या औषधाचे उत्पादन कमी झाले आहे.

हे औषध अँटी-मलेरिया औषध क्लोरोक्विनपेक्षा थोडे वेगळे आहे. हे एक टॅबलेट आहे, ज्याचा उपयोग ऑटोइम्यून रोगांच्या उपचारांमध्ये केला जातो, परंतु कोरोना रोखण्यासाठीही याचा उपयोग केला गेला आहे. याचा परिणाम सार्स-सीओव्ही-2 वर होत आहे. त्यामुळे हे औषध कोरोनाग्रस्तांना दिले जात आहे.

भारत असे करतो या औषधाचे उत्पादन –

ब्राझील आणि चीन भारताला हायड्रॉक्सी क्लोरोक्विन गोळ्या तयार करण्यात मदत करतात. यासाठी आवश्यक कच्चा माल ब्राझील आणि चीनमधून पुरविला जातो. म्हणूनच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर पंतप्रधान मोदींनी ब्राझीलचे राष्ट्रपती जैयर बोल्सनारो यांच्याशी चर्चा केली. ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी यावेळी आश्वासन दिले की हायड्रोक्सी क्लोरोक्विनचे उत्पादन कमी होणार नाही.

निर्यातवर बंदी –

अलीकडेच, भारत सरकारने हायड्रोक्सी क्लोरोक्विनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. सरकारचे म्हणणे आहे की या औषधाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी त्वरित याचा निर्यात थांबविणे आवश्यक आहे. ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेमध्ये देखील मोदींशी झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली.

Leave a Comment