कोरोना : विना विजेचा 6 तास चालणारा व्हेंटिलेटर वाचवणार प्राण

ग्रामीण व दुर्गम भागात वीज गेल्याने व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णाला समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. काही वेळेस रुग्णाचे प्राण देखील जातात. मात्र आता आयआयटी हैदराबादच्या वैज्ञानिकांनी इंटरनेट ऑफ थिंकिंगवर आधारित व्हेंटिलेटर तयार केला आहे. या व्हेंटिलेटरची खास गोष्ट म्हणजे हा मोबाईल अ‍ॅपवर चालतो. या व्हेंटिलेटरला जीवन लाइट नाव देण्यात आले आहे.

हा व्हेंटिलेटर सामान्य बॅटरीवर देखील 5 ते 6 तास काम करू शकतो. व्हेंटिलेटरची किंमत 1 लाख रुपये आहे. जग कोरोना व्हायरस महामारीचा सामना करत असताना आयआयटी हैदराबादच्या सेंटर फॉर हेल्थकेअर एंटरप्रेन्योरशिपच्या इनक्यूबेटेड स्टार्टअप एरोबियोसिस इनोव्हेशंसने या व्हेंटिलेटरला तयार केले आहे.

प्रोफेसर रेनू जॉन यांच्यानुसार, या व्हेंटिलेटरमध्ये व्हायरलेस कनेक्टिव्हिटी आहे. हा व्हेंटिलेटर रिमोटद्वारे देखील कंट्रोल केला जाईल. ग्रामीण आणि दुर्गम भागात वीज गेल्यावर देखील हे व्हेंटिलेटर खूपच फायदेशीर ठरेल.

Leave a Comment