सुचनांकडे दुर्लक्ष करून चार्टेड विमानाने केला प्रवास, 44 युवकांना कोरोनाची लागण

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी गर्दी करू नये, तसेच प्रवास टाळावा अशा सुचना मागील अनेक दिवसांपासून दिल्या जात आहेत. मात्र या सुचनांकडे दुर्लक्ष करत चार्टेड विमानाने प्रवास करणाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकार अमेरिकेच्या टेक्सास येथे घडला आहे.

टेक्सास यूनिवर्सिटीतील 20च्या वयोगटातील जवळपास 70 विद्यार्थी चार्टेड विमानाने प्रवास करत मॅक्सिकोला फिरायला गेले होते. आता यातील 44 युवकांना कोरोनाची लागण झाली आहे.

टेक्सासचे स्पीकर डेनिस बोनेन म्हणाले की, कोरोना व्हायरस तुमच्याशी संबंधित नाही, तुम्हाला होणार नाही, असे वाटत असले तरी असे नाही. कॉलेजचे विद्यार्थी मॅक्सिकोमध्ये सुट्टी साजरी करत आहेत व हे अनेकांवर परिणाम करत आहेत.

मॅक्सिकोमधून परतताना यातील अनेकांनी कमर्शियल विमानाने देखील प्रवास केला होता. त्यामुळे या विमानात प्रवास करणारे देखील संक्रमित होण्याची अधिकाऱ्यांना भिती आहे.

टेक्सास यूनिवर्सिटीने विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, अधिकाऱ्यांद्वारे जारी नियमांचे पालन करावे व चेतावणीला गंभीरतेने घ्यावेत. लागण झालेल्या विद्यार्थ्यांना सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेले आहे.

Leave a Comment