कोरोना : मलेशियाला निघालेल्या 8 तबलिगींना विमानतळावर पकडले

तबलिगी जमातशी संबंधित 8 मलेशियन नागरिकांना दिल्लीवरून कुआला लंपूरला जाणाऱ्या विमानातून उतरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या 8 मलेशियन नागरिकांनी दिल्लीतील निझामुद्दीन येथे झालेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमात भाग घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना विमानातून उतरवले.

ही कारवाई रविवारी दुपारी करण्यात आली. मलिंडो एअरचे विमान 30 मलेशियन नागरिकांना घेऊन मुंबईमार्गे दिल्लीहून कुआला लंपूरला उड्डाण घेणार होते. अधिकाऱ्यांनी या सर्व नागरिकांना पोलिसांच्या हवाली केले असून, आता या सर्वांना भारतात क्वारंटाईन करण्यात आले आहे.

दरम्यान, तबलिगी जमातमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांचा विविध राज्यात शोध घेतला जात आहे. या मरकजमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांद्वारे विविध राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरला आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या शेकडो लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

Leave a Comment