महाराष्ट्राचे टेन्शन कायम! राज्यात आढळले ४७ नवे कोरोनाग्रस्त


मुंबई – राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४७ ने वाढल्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ५३७ वर गेल्याची माहिती महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. या ४७ कोरोनाग्रस्तांपैकी ४३ रुग्ण मुंबई आणि ठाण्यातील असल्यामुळे राज्याची चिंता आणखी वाढली आहे. २८ पॉझिटिव्ह रुग्ण मुंबईत तर १५ पॉझिटिव्ह रुग्ण ठाण्यात सापडले आहेत. अमरावतीत १ रुग्ण, २ पुण्यात, तर पिंपरीत १ रुग्ण सापडला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ५३७ वर गेली आहे. ही संख्या शुक्रवारी रात्रीपर्यंत ४९० होती. आता ही संख्या ५३७ झाली आहे.

राज्यासह देशभरात सध्या लॉकडाउन आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घेतली जाते आहे. कोरोनाचे रुग्ण ज्या ठिकाणी आढळतात तो भाग सील केला जात आहे. पण असे असले तरीही कोरोनाग्रस्तांचे दररोज वाढणारे आकडे चिंतेत भर घालणारे ठरत आहेत. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. अशात आता देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. लॉकडाउनचे नियम काटेकोरपणे पाळा अन्यथा आज बाहेर फिरणारे उद्या रुग्णालयांमध्ये दिसतील असे अजित पवार यांनी गुरुवारीच म्हटले होते.

Leave a Comment