विदर्भात कोरोनाचा दुसरा 2 बळी, राज्यातील मृतांचा आकडा 21 वर


अमरावती : जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाने अनेक निष्पाप लोकांचा बळी घेतला आहे. कोरोना रुग्णांच्या मृतांच्या संख्यमध्ये महाराष्ट्रातही वाढ झाली आहे. कोरोनाने अमरावतीमध्येही पहिला बळी घेतला आहे. कोरोनामुळे अमरावती शहरातील एका इसमाचा मृत्यू झाला. त्यामुळे आता राज्यातील कोरोना मृतांची आकडा 21 वर पोहोचला आहे. यामध्ये मुंबईत 17, मुंबई उपनगरात 1, पुण्यात 1, बुलढाणा 1, अमरावतीमध्ये 1 असा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2 एप्रिल रोजी एका इसमाला कोरोना झाल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. पण त्याच दिवशी सकाळी 9.30 वाजचा रुग्णाचा मृत्यू झाला. त्याचा आज पहाटे 3 वाजता कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा आला अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हैदरपुरा परिसर पूर्णपणे सील केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात काल दिवसअखेर कोरोना व्हायरसचे 490 रुग्ण झाले. गेल्या 24 तासांत 67 नवे रुग्ण सापडले. त्यातील सर्वाधिक मुंबईत सापडले. त्यानंतर पुण्यात कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ झाली आहे. दिवसभरात मुंबईत 43 कोरोनाग्रस्त दाखल झाले. त्यामुळे मुंबईतल्या कोरोनाबाधितांची संख्या 278 झाली आहे. पुण्यात 9 रुग्ण सापडले तर नवी मुंबईत 8 कोरोनाग्रस्त सापडले.

Leave a Comment