राज्य सरकारचा मोठा निर्णय़! पंढरपुरातील यावर्षीचा चैत्र वारी सोहळा रद्द


मुंबई : आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी बोलताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व उत्सव, सोहळे रद्द करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे आता महाराष्ट्राचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव असलेला पंढरपुरातील चैत्र वारीचा सोहळा रद्द करण्यात आला आहे.

महाराष्ट्रासाठी पंढरपूरचा वारी सोहळा हा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव आहे. सूक्ष्म बीज वारीच्यानिमित्ताने वारकऱ्याच्या आणि भक्त भागवताच्या अंत:करणात विठ्ठलभक्तीचे हे रुजते आणि त्याला विठ्ठलाच्या दर्शनाने बहर येतो. परिणामी आज चैत्र वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. वारकरी संप्रदायातील महत्त्वाची मानली जाणारी चैत्र वारी अखेर रद्द करण्यात आली आहे. या वारीचा दि.4 एप्रिल रोजी मुख्य दिवस म्हणजेच चैत्र एकादशी आहे.

पण यंदा आपल्या देशावर कोरोनाचे संकट असून त्यातच महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे. अशावेळी आजाराचा फैलाव रोखण्यासाठी लोकांनी एका ठिकाणी जमा न होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी यासाठी राज्यात लॉकडाऊन केले आहे. नागरिकांनी अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन पुढील काही दिवस करणे गरजेचे असून सर्व सण-उत्सव घरच्या घरी साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. नागरिकांनी यंदा गुढीपाडवाही घरच्या घरीच साजरा केला. त्यानुसार राज्यातील सर्व सोहळे घरात साजरे करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

याशिवाय यंदाच्या वर्षी महाराष्ट्राच्या आराध्य दैवत विठ्ठलाच्या भेटीसाठी शेकडो वर्षांपासून सुरू असलेली चैत्र वारी रद्द केल्याचे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मंदिर समितीने दि.17 मार्च ते 31 मार्च अखेर श्री विठ्ठल -रुक्‍मिणीमातेचे दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तो वाढवून आता 14 एप्रिलपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले आहे. मात्र देवाची नित्यपुजा सुरु राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Comment