मुंबईत आढळला आणखी एक कोरोनाग्रस्त; धारावीतील 30 वर्षीय महिलेला लागण


मुंबई – धारावीत कोरोनाचा चौथा रुग्ण आढळला असून तेथील बलिगा नगरमधील एका ३० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. धारावीत दिल्लीच्या मरकजसाठी गेलेले पाचजण गेले होते. धारावीत ते पाचही जण राहिले होते. हे लोक ज्याच्या फ्लॅटमध्ये राहिले होते, त्याचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान मरकजहून आलेल्या पाच जणांचा संपर्क २ ते ३ दिवसांच्या कालावधीत किमान १०० जणांशी आला होता, अशीही माहिती मिळते आहे. या संदर्भातील वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. आजच महाराष्ट्रात ४७ नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यापैकी ४३ जण हे मुंबई आणि ठाण्यातील आहेत. अशात आता धारावीत चौथा रुग्ण आढळल्याने चिंता आणखी वाढली आहे.

धारावीत आलेले तबलीगी जमातचे पाच लोक नंतर केरळला गेले. त्यांच्या संपर्कात आलेल्या धारावीत राहणाऱ्या ५९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आणि त्याचा मृत्यूही झाला. आता याच बलिगा नगर येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे अशी माहिती समोर आली आहे.

Leave a Comment