क्रिकेट सेन्सेशन स्मृती मंधनाला हवा असा जीवनसाथी


फोटो सौजन्य क्रिकेट कंट्री
लॉकडाऊन मुळे देशात काही ठराविक क्षेत्रे सोडली तर बाकी सर्व नागरिक घरात बंद आहेत आणि त्याला खेळाडूही अपवाद नाहीत. भारतीय महिला क्रिकेट टीमची खंदी फलंदाज स्मृती मांधाना तिच्या तडाखेबाज फलंदाजी साठी जशी प्रसिद्ध आहे तशीच तिच्या सौंदर्याबद्दलही. तिच्या क्रिकेट चाहत्यांसाठी तिने घरबसल्या ट्विटरवरून नुकताच एक प्रश्नउत्तर कार्यक्रम केला.

या कार्यक्रमात एका चाहत्याने तिला जीवनसाथी कसा हवा असा प्रश्न विचारला. २३ वर्षीय स्मृतीने त्याला उत्तर देताना सांगितले, यासाठी माझी पहिली अट तो माझ्यावर खूप प्रेम करणारा हवा आणि दुसरी अट म्हणजे पहिली अट मानणारा हवा. स्मृती केवळ सुंदरच नाही तर बुद्धिमानही आहे याची चुणूक या उत्तरातून तिने दाखविल्याची चर्चा आहे. काही असो, स्मृतीला लव अरेंज मॅरेज करायचे आहे असेही तिने स्पष्ट केले आहे.

२०१७ च्या आयसीसी महिला वनडे विश्व कप स्पर्धेत स्मृती खूप चर्चेत आली होती. त्यावेळीही तिच्या सौंदर्याची तारीफ खूप केली गेली. आता ती एक अव्वल फलंदाज म्हणूनही चर्चेत आहे. भारतातर्फे तिने दोन कसोटी सामने खेळले आहेत. तिने ५१ वनडे मध्ये २०२५ धावा काढल्या असून त्यात ४ शतके आणि ७ अर्धशतके आहेत. आंतरराष्ट्रीय ती २० मध्ये तिने ७४ सामन्यात १७०५ धावा काढल्या आहेत.

Leave a Comment