लॉकडाऊनचा असाही परिणाम, हजारो जेलीफिश परतल्या समुद्रकिनारी

कोरोना व्हायरसमुळे लोक आपआपल्या घरात क्वारंटाईन झालेली आहेत. याचा चांगला परिणाम पर्यावरण आणि जीवसृष्टीवर पाहण्यास मिळत आहे. एकेकाळी गर्दीने भरलेला असलेला फिलीपाईन्स मधील पालवान येथील समुद्र किनारा लॉकडाऊनमुळे ओस पडला आहे. अशा स्थितीत हजारो गुलाबी जेलीफिश कोरोंग कोरोंग बिचवर पाहण्यास मिळाल्या.

ऑस्ट्रेलियाच्या ग्रिफथ यूनिवर्सिटीचे मरीन बायोलॉजीमध्ये पीएचडी करत असलेले शेल्डन रेय बोको यांच्यानुसार, या जेलफिश हजारोंच्या संख्येने जानेवारी-फेब्रुवारीमध्ये येथे असतात. मात्र हवा आणि सध्याच्या परिस्थितीमुळे त्या मार्चमध्ये देखील येथे दिसत आहेत.

वातावरण, पाण्याचा वेग आणि सध्याच्या स्थितीचा देखील परिणाम पाहण्याच मिळत आहे. काही वर्ष अशी असतात जेलीफिशचे प्रमाण खूपच वाढते व काहीवेळेस त्या दिसतच नाहीत.

जेलीफिशची फूड म्हणून देखील विक्री केली जाते. मात्र सध्याच्या परिस्थिती असे करता येत नसल्याने, त्यांचे समुद्र किनाऱ्यावर एवढे प्रमाण असल्याचे देखील सांगितले जात आहे.

Leave a Comment