धक्कादायक ! कोरोनामुळे 2 आठवड्यात 1 कोटी लोक बेरोजगार

अमेरिकेने कोरोनाग्रस्तांची बाबतीत चीनला देखील मागे टाकले आहे. मात्र कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येबरोबरच अमेरिकेत बेरोजगारीचा आलेख देखील वाढत चालला आहे.

अमेरिकेच्या कामगार मंत्रालयानुसार, मागील आठवड्यात तब्बल 66 लाखांपेक्षा अधिक कामगारांनी बेरोजगार भत्त्यासाठी अर्ज केला आहे. त्याच्या आधीच्या आठवड्यात 33 लाख कामगारांनी बेरोजगारी भत्त्यासाठी अर्ज केला होता. या प्रमाणे मागील दोन आठवड्यात बेरोजगार झालेल्यांची संख्या 1 कोटींवर पोहचली आहे.

अमेरिकेतील बेरोजगारांची संख्या या पेक्षा अधिक आहे. रिपोर्टनुसार लोकांनी टेलिफोन लाईन व्यस्त येणे आणि अर्ज करण्यास अडचणी आल्याच्या तक्रारी केल्या आहेत. याशिवाय अर्ध-वेळ कामगार आणि इतर काही श्रेणीतील कामगारांना बेरोजगारी भत्त्याची सुविधा मिळालेली नाही.

कोरोना व्हायरसमुळे अमेरिकन कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहे. यामुळे येणाऱ्या काळात यापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना सरकारी सहाय्यतावर अवलंबून राहावे लागणार आहे.

रिफनिटिव्हनुसार, मार्चमध्ये अमेरिकेत 1 लाख लोक नोकऱ्या गमवू शकतात. यामुळे बेरोजगारीचा दर 3.8 टक्क्यांवर पोहचू शकतो. बेरोजगारी दर 9 टक्क्यांपर्यंत पोहचू शकतो.

जगातील सर्वात मोठी इंटरटेनमेंट कंपनी डिज्नीने देखील आपल्या काही कर्मचाऱ्यांनी सुट्टीवर पाठवणार आहे. ही प्रक्रिया 19 एप्रिलपासून सुरू होईल.

Leave a Comment