अत्यावश्यक सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्यास ‘रासुका’ अंतर्गत कारवाई

कोरोनाशी लढणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची, त्यांना धक्काबुक्की केल्याच्या अनेक घटना सध्या समोर येत आहेत. या पार्श्वभुमीवर उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर आता राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (रासुका) कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.

पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागात पोलीस कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना समोर आल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी हा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिलला मुझफ्फरनगर येथे घरातून बाहेर पडण्यास मनाई केल्याने पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता.

आजतकने दिलेल्यानुसार, गाझियाबादमध्ये तबलीग जमातीच्या काही लोकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी गैरवर्तनाच्या घटनेत कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. इंदुरमध्ये देखील डॉक्टर आणि नर्सवर काही जणांनी दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांवर मध्य प्रदेश सरकारने रासुका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Comment