खुशखबर ! कोरोना व्हायरसवरील लस तयार, लवकरच होणार चाचणी

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसवर लस शोधण्याचे काम जगभरातील वैज्ञानिक करत आहेत. अनेक देशांच्या वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, त्यांच्या येथे लस तयार होत आहे. मात्र आता अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, त्यांच्या लसीद्वारे कोरोनाचा संसर्ग रोखता येईल.

यूनिवर्सिटी ऑफ पिट्सबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनच्या वैज्ञानिकांनुसार, इतर देशांच्या तुलनेत त्यांनी सर्वात लवकर लस तयार केली आहे. यासाठी त्यांनी सार्स आणि मर्सच्या कोरोना व्हायरसचा आधार घेतला आहे.

असोसिएट प्रोफेसर आंद्रिया गमबोट्टो यांच्यानुसार, सार्स आणि मर्सचे व्हायरस काही प्रमाणात कोरोना व्हायरसशी मिळते जुळते आहेत. या तिन्ही व्हायरसच्या बाहेरील पडदा (स्पायक प्रोटीन) भेदणे गरजेचे आहे, ज्यामुळे या व्हायरसवर मात करता येईल.

गमबोट्टो यांच्यानुसार, या व्हायरसला कसे नष्ट करायचे हे समजले आहे. लसीचा उंदरावर देखील प्रयोग करण्यात आला आहे व त्याचे परिणाम चांगले आले आहेत.

या लसीचे नाव पिटगोवॅक ठेवले आहे. लसीमुळे उंदराच्या शरीरात असे अँटीबॉडीज निर्माण झाले, जे कोरोना व्हायरसला रोखू शकतात. या व्हायरसला रोखण्यासाठी जेवढ्या अँटीबॉडीजची शरीराला गरज आहे. तेवढे ही लस पुर्ण करते. या लसीचे परिक्षण लवकरच मनुष्यावर केले जाणार असल्याचे गमबोट्टो यांनी सांगितले.

पुढील काही महिन्यात मनुष्यावर या लसीचे परिक्षण केले जाणार असून, ही लस एखाद्या इंजेक्शनसारखी नाही. हे चौरस पॅचसारखे आहे, जे शरीराच्या कोणत्याही ठिकाणी चिटकवता येईल. या पॅचमध्ये 400 पेक्षा अधिक लहान-लहान सुया आहेत, ज्या साखरेपासून बनविण्यात आल्या आहेत. या पॅचद्वारे त्यातील हवा शरीरात पोहचवली जाते. लस देण्याची  ही पद्धत एकदम नवीन आहे.

मात्र अँटीबॉडीचा प्रभाव उंदराच्या शरीरावर किती काळ राहील हे गमबोट्टो यांच्या टीमकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.

Leave a Comment