संधोशन : लॉकडाऊनमुळे कोरोनावर मात करू शकतो भारत

कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने 21 दिवस लॉकडाऊनची घोषणा केली होती. सरकारच्या या निर्णयावर अनेकांनी टीका देखील केली. मात्र एका अभ्यासात दावा करण्यात आला आहे की, 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे भारत कोरोना व्हायरसवर मात करू शकतो.

उत्तर प्रदेशच्या शिव नादर यूनिवर्सिटीच्या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, भारतात लॉकडाऊनच्या 20व्या दिवशी कोरोना व्हायरसची लक्षण असलेल्या लोकांची संभावित संख्या पहिल्या दिवसाच्या तुलनेत 82 टक्के कमी असू शकते.

या संशोधनाशी संबंधित सहाय्यक प्राध्यापक समित भट्टाचार्य यांच्यानुसार, देशातील 80 ते 90 टक्के लोकसंख्या सोशल डिस्टेंसिगचे पालन करत आहे. या आशावादी परिस्थितीत पहिल्या दिवसाच्या तुलनेत लॉकडाऊनच्या 20व्या दिवशी अपेक्षित आकडेवारीत 83% घट होण्याची शक्यता आहे.

संशोधकांचे म्हणणे आहे की, सरकारतर्फे 24 मार्चला घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे संक्रमणाचा प्रसार कमी झाला आहे. यामुळे दररोज सापडणारे संक्रमित रुग्ण आणि बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या समान होऊ शकते. जसजसे दिवस वाढतील तसतसे नवीन प्रकरणांची संख्या कमी होत होत जाईल आणि आरोग्य सेवा तंत्रावरील दबाव कमी होत जाईल. मात्र पुढील दोन किंवा तीन महिन्यांपर्यंत समांतर वक्र राखणे फार कठीण आहे, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

प्रा. नागा सुरेश वीरपु यांनी चेतावणी दिली आहे की, जर प्रतिबंध व्यवस्थित पाळला  गेला नाहीतर लॉकडाऊनपासून 40व्या दिवशी संक्रमित रूग्णांची अंदाजे संख्या 2,70,360 असू शकते आणि 5407 लोकांचा मृत्यू होऊ शकतो.

Leave a Comment