कोरोना : केरळच्या विद्यार्थ्यांकडून स्वस्त व्हेंटिलेटरची निर्मिती

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटरची गरज भासत आहे. यातच केरळच्या तिरुवनंतपुरम येथील श्री चित्रा तिरुनल इंस्टिट्यू ऑफ मेडिकल सायन्सेज अँड टेक्नोलॉजीच्या विद्यार्थ्यांनी एक इमर्जेंसी व्हेंटिलेटर सिस्टम तयार केली आहे. हे व्हेंटिलेटर खूप कमी खर्चात काम करते.

केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत संचालित या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी व्हेंटिलेटर सिस्टमचे एक प्रोटोटाईप देखील तयार केले आहे. याच्या उत्पादनासाठी बंगळुरूच्या विप्रो 3डी कंपनीशी करार करण्यात आलेला आहे.

ही सिस्टम ऑर्टिफिशियल मॅन्युअल ब्रिदिंग यूनिट (एएमबीयू) वर आधारित आहे. याची सर्वात खास गोष्ट याचा आकार आहे. या उपक्रमाला हाताने उचलणे शक्य आहे. यासाठी एमएमबीयू बँक अथवा एक बॅग वॉल्व मास्क (बीवीएम) हातात उचलून रुग्णाला पॉजिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेशनद्वारे मदत केली जाते.

संस्थेचे संचालक डॉ. आशा किशोर यांनी सांगितले की, हे तंत्रज्ञान केवळ एक आठवड्यात तयार करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसच्या महामारीच्या काळात हे उपकरण खूपच फायदेशीर ठरू शकते.

Leave a Comment