कोरोनामुळे द्वितीय विश्वयुद्धानंतर पहिल्यांदाच सर्वाधिक स्वच्छ हवा

कोरोना व्हायरसमुळे लाखो लोकांना श्वास घेण्यास समस्या येत आहेत. मात्र याचा चांगला परिणाम पृथ्वी आणि पर्यावरणावर झाला आहे. अनेक वर्षांनी पृथ्वीवर स्वच्छ हवा दिसत आहे. पृथ्वीवर एवढी स्वच्छ हवा याआधी 75 वर्षांपुर्वी होती. द्वितीय विश्वयुद्धा वेळी एवढी स्वच्छ हवा झाली होती.

वैज्ञानिकांना आशा आहे की, द्वितीय विश्वयुद्धानंतर पहिल्यांदा पृथ्वीवरील कार्बन उत्सर्जन सर्वाधिक कमी असेल. लॉकडाऊनमुळे कार्बन उत्सर्जन कमी झाले आहे.

ग्लोबल कार्बन प्रोडेक्टचे प्रमुख रॉब जॅक्सन यांच्यानुसर, यावर्षी कार्बन उत्सर्जनात 5 टक्क्यांनी घट अपेक्षित आहे. यापूर्वी  2008 मध्ये आर्थिक मंदीच्या काळात कार्बन उत्सर्जन 1.4 टक्क्यीं कमी झाले होते. जॅक्सन हे कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड यूनिवर्सिटीमध्ये प्राध्यापक आहेत.

रॉब जॅक्सन म्हणाले की, दुसऱ्या महायुद्धावेळी अनेक देश बंद होते. बाजारपेठा, वाहतूक, उद्योग बंद होते. त्यामुळे हवेतील प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली. तेच दृश्य सध्या दिसत आहे. कोरोना व्हायरस सारख्या महामारी दरम्यान कार्बन उत्सर्जन कमी होणे ही एक छोटीशी चांगली बातमी आहे.

जॅक्सन यांच्यानुसार, कमी झालेले हे प्रदुषण तात्पुरते आहे. लॉकडाऊन काढल्यानंतर पुन्हा त्याच घाणीत जगावे लागेल. पृथ्वी देखील त्याच प्रदुषणयुक्त हवेत श्वास घेईल. मात्र हे हळूहळू कमी करणे गरजेचे आहे.

पूर्व इंग्लंडच्या यूनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट एंग्लियाच्या पर्यावरणवादी कोरीने ले क्वेरे यांच्यानुसार, 2008 मध्ये आलेल्या आर्थिक मंदीनंतर पृथ्वीवरील ग्रीन हाऊसचा उत्सर्जन आश्चर्यकारकरित्या कमी झाला होता. मात्र त्यानंतर हे प्रमाण 5.1 टक्क्यांनी वाढले. चीनमध्ये लॉकडाऊनमुळे प्रदूषणाचा स्तर आणि कार्बन उत्सर्जन 25 टक्क्यांनी कमी झाले आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये संयुक्त राष्ट्राने एक रिपोर्ट प्रकाशित केला होता. यानुसार, जर दरवर्षी कार्बन उत्सर्जन 7.6 टक्क्यांनी कमी झाले तर ग्लोबल वॉर्मिंग 1.5 डिग्री सेल्सियसने कमी होईल.

वैज्ञानिकांनुसार, कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे कार्बन उत्सर्जन 10 ते 20 टक्क्यांनी कमी झाले तर 2021 च्या सुरूवातीला हे पुन्हा वाढू लागेल, जे चिंतेचा विषय आहे.

Leave a Comment