मुंबईत कोरोना; बेस्ट कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण


मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याआधी धारावीमधील एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली होती. आता बेस्ट कर्मचाऱ्याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. हा कर्मचारी मुंबईच्या वडाळा बस डेपोत पुरवठा विभागात काम करत आहे. दरम्यान, एसआरव्ही रुग्णालयात उपचारासाठी या कर्मचाऱ्याला दाखल करण्यात आले आहे.

आणखी काही कर्मचारी या बेस्ट कर्मचाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळे चिंता वाढली आहे. हा कर्मचारी शुक्रवारी कामावर दाखल झाला होता. पण, त्याआधी हा कर्मचारी सुट्टीवर होता. त्यामुळे सुट्टीच्या कालावधीत कोठे गेला होता. त्याच्या संपर्कात कोण आले याची माहिती घेण्यात येणार आहे. तसेच मुंबईच्या टिळकनगर भागात हा कर्मचारी राहत होता, त्या इमारतीला सील केले गेले आहे. या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांना १४ दिवस क्वारंटाईन राहायला सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाचा अधिक धोका वाढला आहे.

Leave a Comment