दिलासादायक; मुंबईतील त्या 3 दिवसांच्या बाळासह आईचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह


मुंबई : चेंबूर येथील एका रुग्णालयात तीन दिवसाच्या बाळासह आईला कोरोनाची लागण झाल्याची माहिती काल समोर आली होती. दरम्यान त्या तीन दिवसांच्या बाळसह त्याच्या आईचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. यामुळे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. या महिलेला कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या वॉर्डमध्ये निर्जंतुकीकरण न करताच ठेवण्यात आले होते. त्यादरम्यानच महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर महिलेला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज तिच्या बाळाचा आणि तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

महिलेला आणि तिच्या बाळाला सध्या कस्तुरबा रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून त्यांना डिस्चार्ज देण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्याचप्रमाणे या महिलेच्या पतीला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

Leave a Comment