देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात वाढ; 2543 पेक्षा जास्त बाधीत, तर 53 जणांचा मृत्यू


नवी दिल्ली : देशामधील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात वाढ झाली असून कोरोनाचा संसंर्ग झालेल्यांची संख्या 2543 वर पोहोचली आहे. त्यापैकी 179 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर 53 लोकांना या व्हायरसमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. मागील 24 तासांमध्ये 328 कोरोनाचे नवे रूग्ण समोर आले आहेत. तर महाराष्ट्रात 339, केरळमध्ये 286, तामिळनाडूमध्ये 309, दिल्लीमध्ये 219, आंध्र प्रदेशमध्ये 135, राजस्थानमध्ये 133, तेलंगणामध्ये 127, कर्नाटकामध्ये 121, उत्तरप्रदेशमध्ये 121, मध्यप्रदेशात 98 रूग्ण आढळून आले आहेत.

गुरुवारी यासंदर्भातील माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली, दिल्लीत झालेल्या धार्मिक प्रकरणाच्या चौकशीदरम्यान, 9000 लोकांचा शोध घेण्यात आला आहे. या लोकांचा संबंध तबलिगींशी होता. यामध्ये 1306 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. तर दिल्लीत शोधण्यात आलेल्या 2500 लोकांपैकी 250 विदेशी नागरिकांचा समावेश होता. यापैकी 1804 लोकांना कॉरन्टाईन करण्यात आले आहे. कोरोनाची लक्षणं असलेल्या 334 लोकांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांमध्ये 12 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment