तबलिगी जमातचे 10 जण हातावरील शिक्क्यासह पुण्यातून फरार


पुणे – दिल्लीतील निजामुद्दीनहून तबलिगी जमातच्या प्रचार-प्रसारासाठी पुणे जिल्ह्यात दाखल झालेले 10 जण फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे होमक्वारंटाईनचा शिक्का सगळ्यांच्या हातावर मारलेला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तबलिगी जमातचे 10 जण पुणे जिल्ह्यातील शिरूर येथून पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे होमक्वॉरंटाईनचा शिक्का या सगळ्यांच्या हातावर मारलेला आहे. हे सगळे महिनाभरापूर्वी दिल्ली येथून शिरूर येथे आले होते. परंतु देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे हे सर्वजण शिरूर शहरात अडकले होते. त्यांना होमक्वारंटाईन करण्यात आले होते. परंतु, हे सर्वजण गुरुवारी रात्री एका मालवाहतूक ट्रकमध्ये बसून शिरूरहून दिल्लीच्या दिशेने पळून गेल्याची माहिती समोर आला आहे.

एकीकडे दिल्लीला तबलिगी जमातच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे देशात एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे त्याच कार्यक्रमाच्या प्रसारासाठी शिरूरमध्ये आलेले 10 जण पळून गेलेच कसे? असा मोठा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. आता शिरूर पोलिस स्टेशनमध्ये या सर्वांवर भादंवि कलम 188, 269, 271 तसेच महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 135 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 51 (ब), मोटर वाहन कायदा कलम 66(1), 192 तसेच भारतीय साथ रोग अधिनियम 1897 चे कलम 2,3,4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment