ब्रिटनने मोडला चीनचा विक्रम, 10 दिवसात उभारले 4 हजार बेड्सचे हॉस्पिटल

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने वाढत चालला असून, दररोज मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. काही दिवसांपुर्वी चीनमध्ये कोरोनाग्रस्तांसाठी 10 दिवसांमध्ये 1 हजार बेड्सचे तात्पुरते हॉस्पिटल उभारण्यात आले होते. मात्र ब्रिटनने चीनचा हा विक्रम मोडत 10 दिवसांच्या विक्रमी वेळेत 4 हजार बेड्सचे इमर्जेंसी हॉस्पिटल उभारले आहे.

या हॉस्पिटलला नाईटिंगेल हॉस्पिटल नाव देण्यात आले आहे. या हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार सुरू झाले आहेत.

ब्रिटनमध्ये कोरोना प्रसार वाढत चालल्याचे लक्षात आल्यानंतर ब्रिटनने सैन्याला बोलवत 10 दिवसात 4 हजार बेड्सचे हॉस्पिटल तयार केले आहे. पुर्व लंडनमधील डॉकलँड जिल्ह्यातील कन्वेंशन सेंटरचेच हॉस्पिटलमध्ये रुपांतर करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये 2-2 हजार बेडचे वॉर्ड करण्यात आले आहेत. हे हॉस्पिटल सुरूवातीला 500 बेड्ससह संचालित केले जाईल. यात वेंटिलेटर आणि ऑक्सिजन सारख्या सर्व सुविधा आहेत.

सैन्याचे 200 जवान, इंजिनिअर, डॉक्टरांच्या टीमने हे हॉस्पिटल विक्रमी वेळेत तयार केले. लंडन व्यतिरिक्त मॅनचेस्टर, बर्मिंघम आणि ग्लास्को येथे देखील हॉस्पिटल उभारण्यात आले आहेत.

Leave a Comment