उपचार करणाऱ्या डॉक्टरांवरच थुंकले तबलिगी जमातीचे लोक


नवी दिल्ली – दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमात मरकजच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर नॉर्थर्न रेल्वेच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये तबलिगी जमातच्या 167 सदस्यांना हलवण्यात आले आहे. पण त्यांच्याकडून यावेळी डॉक्टर आणि तिथे उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत असभ्य वर्तन केले जात असल्याची माहिती नॉर्थन रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी दिली आहे.

या समाजातील लोकांनी क्वारंटाइनमधील कर्मचाऱ्यांसोबत चुकीचे वर्तन केले. त्याचबरोबर ते सगळीकडे थुंकत होते. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आलेल्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अंगावरही थुंकत होते. त्याचबरोबर हॉस्टेल इमारतीच्या आजुबाजूला फिरत होते, अशी धक्कादायक माहिती दीपक कुमार यांनी दिली आहे.

पाच बसेसमधून तुघलकाबाद क्वारंटाइन सेंटरमध्ये तबलिगी जमात निझामुद्दीनच्या 167 लोकांना आणण्यात आले होते. ते रात्री 9 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास पोहोचले होते. यामधील 97 जणांना डिझेल शेड ट्रेनिंग स्कूल क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले तर 70 जणांना आरपीएफच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये जागा देण्यात आली आहे, पण हे लोक सकाळपासूनच असभ्य वर्तन करत आहेत. जेवणाच्या अवास्तव मागण्या करत असल्याचे दीपक कुमार यांनी सांगितले.

Leave a Comment