कोरोना : उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मदतीला आता रोबोट

कोरोनाग्रस्तांचा उपचार करताना डॉक्टर व इतर वैद्यकिय कर्मचाऱ्यांना देखील कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉक्टरवर कर्मचाऱ्यांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. या रुग्णांना बरे करण्याची जबाबदारी डॉक्टरांची आहे. मात्र आता हॉस्पिटल रोबॉटची मदत घेत आहेत.

डिलिव्हरी रोबॉट –

हॉस्पिटलमध्ये रुग्णांना वेळेवर औषध मिळावे यासाठी रोबॉटची नेमणूक करण्यात आली आहे. हे रोबॉट कर्मचाऱ्यांद्वारे सांगण्यात आलेल्या ठिकाणी औषध पोहचवतात. हे रोबॉट एकसोबत तीन जणांचे काम करतात. हे रोबॉट आयसोलेशन वॉर्डमध्ये बेड, औषध आणि जेवण देखील रुग्णांपर्यंत पोहचवतात.

कोरोना व्हायरस रोबॉट –

हे रोबॉट डॉक्टरांद्वारे करण्यात येणारे काम जसे की, अल्ट्रासाउंड, चाचणी, तापमान तपासणे आणि रुग्णांच्या अंगाद्वारे निघणारे आवाज ऐकतात. रोबॉटमधील कॅमेऱ्याद्वारे कर्मचारी रुग्णांवर लक्ष ठेऊ शकतात. रुग्णाची तपासणी केल्यानंतर स्वतःला सॅनिटाईज देखील करतो.

यूव्हीडी रोबॉट –

हा रोबॉट यूव्ही लाईटच्या मदतीने हॉस्पिटलच्या रुम्स सॅनिटाईज करतो. हे व्हायरसला नष्ट करण्यास उपयोगी असलेल्या यूव्ही-सी लाईटचा प्रयोग करते. एकदा चार्ज केल्यावर हा रोबॉट 8 तास काम करू शकतो.

किनॉन रोबॉट –

फरशी साफ करण्यापासून ते जेवण, औषध आणि कागदपत्रे पोहचवण्याचे काम हा रोबॉट करतो. स्प्रे नोजलद्वारे सहज बॅक्टेरिया आणि व्हायरस नष्ट करतो.

ग्लाइडर कार्गो प्लेन –

ग्लाइडर एक प्रकारचे कार्गो प्लेन आहे. हे एकदा वापरले जाणारे डिस्पोजेबल ग्लाइडर आधारित लॉजिस्टिक रिसप्लाय सिस्टम आहे. याला हेलिकॉप्टर अथवा विमानाच्या मदतीने याला प्रभावित भागात सोडले जाते.

Leave a Comment