मजूरांवर फवारण्यात आलेले ‘सोडियम हायपोक्लोराईट’ शरीरासाठी अत्यंत घातक

काही दिवसांपुर्वी उत्तर प्रदेशच्या बरेली येथील घरी परतणाऱ्या मजूरांवर जंतूनाशकांची फवारणी करण्यात आल्या व्हिडीओ समोर आला होता. यासाठी सोडियम हायपोक्लोराईटचा वापर करण्यात आला. हे स्विमिंग पूलची सफाई, संक्रमण-घाणेरडा वास दूर करण्यासाठी वापरले जाते. हे शरीरासाठी अत्यंत घातक आहे.

पाण्यात 0.5 टक्क्यांपेक्षा जास्त सोडियम हायपोक्लोराईट असल्यास त्वचा ज्वलन होऊ शकते. हे डोळ्यांना देखील घातक असून, यामुळे खाज सुटणे, जळन होणे यासारखी समस्या होते.

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अनेक अफवा पसरल्या आहेत. गरम पाण्याने अंघोळ केल्याने संसर्ग होत नाही, असा दावा करण्यात येत आहे. मात्र हे खोटे आहे. गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेला नुकसान पोहचू शकते. संसर्गपासून वाचण्यासाठी वारंवार हात धुवणे हाच उपाय आहे. याशिवाय मच्छर चावल्याने कोरोनाचा संसर्ग होतो, हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अल्होहल आणि क्लोरिन स्प्रे चेहरा व डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकते. याचा वापर तुम्ही पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी मात्र करू शकता. याशिवाय या परिस्थिती वृद्ध आणि मानसिक रुग्णांची विशेष काळजी घ्यावी.

Leave a Comment