टीक-टॉकची भारताला 100 कोटींची वैद्यकीय मदत

शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टीक-टॉकने कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी भारताला 100 कोटींचे वैद्यकिय उपकरण आणि वस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सरकारने या महामारीपासून सुरक्षित राहण्यासाठी सोशल डिस्टेंसिंग ठेवण्यास सांगितले आहे. तर दुसरीकडे डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी संक्रमित झालेल्या लोकांना बरे करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे.

टीक-टॉक कंपनी 4 लाख मेडिकल प्रोटेक्टिव्ह सूट्स आणि मास्क भारतातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना दान करणार आहे. यांना सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला सोपवले जाईल.

याशिवाय कंपनी दिल्ली आणि महाराष्ट्र सरकारच्या स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांना 2 लाख मास्क देणार आहेत. सोबतच कंपनीकडून पुढील काळात अधिक सहाय्यता उपलब्ध केली जाईल.

मागील आठवड्यातच टीकटॉकने यूनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामसोबत मिळून #GharBaithoIndia नावाचे कॅम्पेन सुरू केले आहे.

 

Leave a Comment