कोरोनाचे मृत्युतांडव; जगभरातील 47 हजारांहून अधिक लोकांचा बळी


नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा कहर जगभरातील बहुतांश देशामध्ये वाढतच चालला आहे. प्रसार माध्यमांच्या माहितीनुसार, जगभरातील 9 लाख 35 हजार 571 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 47 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सर्वाधिक मृत्यू इटली, स्पेन आणि अमेरिकेमध्ये झाले आहेत. दरम्यान, जगभरात 1 लाख 94 हजार 260 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनाने इटलीमध्ये तर अक्षरशः हैदोस घातला आहे. तेथे जवळपास 13,155 लोकांचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त तेथे 110574 लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. दरम्यान, येथे 16847 लोक या महामारीमुळे रिकव्हर झाले आहेत. परंतु, जगभरात 47 हजारपेक्षा अधिक मृत्यूंमुळे सर्वाधिक आकडा इटलीमध्ये आहे.

तर या महामारीमुळे अमेरिकेमध्ये 5109 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 2,15,071 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी 5005 गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे स्पेनमध्ये कोरोनामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती झाली आहे. आतापर्यंत येथे 1,10,574 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. येथे कोरोनामुळे एकूण 9387 लोकांचा मृत्यू झाला आहे. 22 हजारांहून अधिक लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

Leave a Comment