स्मार्टफोनच्या ‘सिग्नल’द्वारे कोरोनाग्रस्तांची ओळख करत आहे चीन

चीनच्या वुहान शहरापासून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसचा प्रसार आज जगभरातील 200 पेक्षा अधिक देशांमध्ये झाला आहे. मात्र आता चीनने काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी चीनने मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे.

वुहानमध्ये आता नागरिकांना कोरोनाची लागण नाही याची ओळख स्मार्टफोनच्या ग्रीन सिग्नलद्वारे ओळखले जात आहे. या आरोग्य कोडद्वारे लोकांना हॉटेल अथवा दुकानात प्रवेश दिला जात आहे.

सबवे स्टेशनवर देखील पोस्टरच्या बार कोडवर फोन स्कॅन केल्यानंतर ग्रीन सिग्नल येतो. यानंतरच तेथील गार्ड आत जाण्याची परवानगी देतात. जर हा लाल लाईटी लागली तर व्यक्ती कोरोनाग्रस्त असल्याचे समजते अथवा त्या व्यक्तीमध्ये कोरोनाचे लक्षण असल्याचे समोर येते.

या व्यतिरिक्त येलो कोड सांगतो की, ही व्यक्ती संक्रमण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आली असून, दोन आठवड्यांचे आयसोलेशन पाळलेले नाही.

चीनचे अधिकारी या कोडच्या मदतीने संक्रमित लोकांची संख्या न वाढवता अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

Leave a Comment