कोरोना : अजीम प्रेमजी फाउंडेशनकडून 1,125 कोटींची मदत

कोरोनाशी लढण्यासाठी देशभरातून मदतीचा हात पुढे करण्यात येत आहे. रतन टाटा, अंबानी यांच्यानंतर आता विप्रो लिमिटेडचे चेअरमन अजीम प्रेमजी देखील यांनी कोट्यावधी रक्कम दान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी 1,125 कोटी रुपये कोरोनाशी लढण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

1,125 कोटींपैकी विप्रो लिमिटेडकडून 100 कोटी रुपये, विप्रो इंटरप्रायझेस लिमिटेडकडून 25 कोटी रुपये आणि अजीम प्रेमजी फाउंडेशनद्वारे 1000 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

या संसाधनांद्वारे या व्हायरसचा सामना करण्यासाठी वैद्यकिय सेवा देण्यास मदत होईल. प्रभावित भागातील लोकांपर्यंत मदत पोहचवली जाईल व वैद्यकिय सेवा दिली जाईल, असे विप्रो कडून सांगण्यात आले आहे. ही रक्कम विप्रोच्या सीएसआर एक्टिव्हिटीपेक्षा वेगळी आहे.

यावर अजीम प्रमेजी फाउंडेशनचे 1600 जणांच्या टीमचे विशेष लक्ष असेल व यात 350 पेक्षा अधिक सिव्हिल सोसायटी पार्टनरचा समावेश आहे.

Leave a Comment