दिल्लीतील ‘निझामुद्दीन’ कनेक्शनमुळे हादरले पुणे प्रशासन, 36 जणांना शोधण्यात पुणे पोलिसांना यश


पुणे : आता पुणे प्रशासन दिल्लीतील ‘निझामुद्दीन’ कनेक्शनमुळे हादरले असून संपूर्ण महाराष्ट्रातून दिल्लीतील निझामुद्दीन येथे आयोजित तब्लिगी जमात परिषदेत सहभागी होण्यासाठी 136 प्रवासी गेले होते. निझामुद्दीन रिटर्नपैकी 36 जण हे पुणे जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा पुणे पोलिसांच्या 40 पथकांकडून शोध घेण्यात आला आहे. परिणामी निझामुद्दीनच्या कार्यक्रमातून देशभर कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.

निझामुद्दीन येथील कार्यक्रमातून परतलेल्या 136 पैकी 36 जण पुण्यातील आहेत. पुणे शहराच्या विविध भागात 36 पैकी 30 जण राहतात तर 3 जण पिंपरी आणि 3 जण हे पुणे ग्रामीण भागात राहतात. दरम्यान, महाराष्ट्रातील 136 पैकी 116 कोरोना संशयितांशी संपर्क साधण्यात प्रशासनाला यश आल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे.

हे 18 मार्चनंतर वेगवेगळ्या तारखेला 136 प्रवासी पुण्यात परतले होते. त्यापैकी अनेक जणांनी फोन बंद करून ठेवले आहेत. सर्व निझामुद्दीनहून परत आलेल्या प्रवाशांची कोरोना लक्षणे तपासली जाणार आहे. पुण्यातील 36 पैकी 5 जणांना आधीच क्वारंटाइन करण्यात आले आहे.

दरम्यान, सध्या दिल्लीच्या निझामुद्दीन येथील तब्लिगी जमात परिषदेमुळे देशभरात भीतीचे वातावरण आहे. फक्त देशातील विविध राज्यांमधूनच नव्हे तर परदेशातूनही लोक 13 ते 15 मार्च दरम्यान हजर होते. निझामुद्दीनमधील तब्लिगी मरकजला त्यांनी भेट दिली. दरम्यान, येथे जमलेल्या बर्‍याच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

या परिषदेत सहभागी झालेल्या 9 जणांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये तेलंगणातील 6 तर कर्नाटक, तामिळनाडू, जम्मु काश्मीर आणि मुंबईतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तामिळनाडूत 50 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी 45 जणांचा निझामुद्दीनशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर 441 जणांमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणे दिसून आली आहेत, अशी माहिती दिल्ली सरकारने दिली आहे. यानंतर तब्बल 2,100 पेक्षा अधिक रुग्णांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

या परिषदेत 1,746 जण सहभागी झाले होते. त्यापैकी 216 परदेशी आणि 1,530 भारतीय नागरिक तिथे राहत होते. जवळपास 824 विदेशी नागरिकांनी देशातील विविध भागातील कार्यक्रमात सहभाग घेतला होता. सर्व राज्यांच्या पोलिसांना 21 मार्चला या 824 विदेशी नागरिकांची माहिती पाठवण्यात आली आहे. शिवाय भारतीय तबलीक जमातीच्या कर्मचाऱ्यांची नावे मिळवण्याच्या सूचना देण्यात 28 मार्चला आल्या आहेत, जेणेकरून या सर्वांची वैद्यकीय चाचणी होईल आणि त्यांना क्वारंटाइन केले जाईल, अशी माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे.

Leave a Comment