मुंबईत पाच हजारांपेक्षा जास्त ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये – राजेश टोपे


मुंबई – राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या वॉर रुमला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथे बैठक घेतली. या बैठकीनंतर बोलताना मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. १६२ वर मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली असून त्याचबरोबर पाच हजारांपेक्षा अधिक जण हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

राजेश टोपे यांनी सांगितलं की, मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या १६२ झाली असून पाच हजारांहून अधिक जण असे आहेत जे अशा लोकांच्या संपर्कात आले असून हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आहेत. आता ही संख्या ५३४३ एवढी आहे. विलगीकरणात या सर्वांना ठेऊन चाचणी केली जाणार आहे. सध्या सर्वांवर लक्ष ठेवले जात आहे. या सर्वांवर चार हजार लोक लक्ष ठेवून आहेत. दरम्यान मुंबईतील वाढता आकडा चिंतेची बाब असून हे आव्हान पुढे कसं पेलायचे यासंबंधी बैठकीत चर्चा झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.

कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच त्याचे संक्रमण वाढू नये यासाठी पूर्ण ते प्रयत्न केले जात आहेत. हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये जे लोक आहेत त्यांच्यावर पूर्ण बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. परिस्थिती नियंत्रणात राखण्यासाठी चार हजार लोकांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

मुंबई शहरात पाच सरकारी, सात खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनची करण्याची सुविधा उपलब्ध असून दोन हजार चाचण्या दिवसाला होऊ शकतात एवढी क्षमता आहे. पण सध्या दिवसाला १२०० चाचण्या होत आहेत. जे प्रोटोकॉल आहेत त्याप्रमाणे चाचणी केली जात आहे. त्यामुळे अतिरिक्त करण्याची आज गरज नाही. तसेच ४६ नवे व्हेंटिलेटर्स आज मिळाले असून १ लाख एन-९५ मास्क उपलब्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment