तबलीग जमातचा मौलाना सादचा ऑडिओ व्हायरल; मरायला मशिदीपेक्षा चांगली जागा नाही


नवी दिल्ली – निजामुद्दीनमधील तबलीगी जमातचे सुमारे 1500 लोक कदाचित तिथेच अडकले असल्याचे सांगत असतील, पण जमात प्रमुखांचा एक व्हायरल ऑडिओ वेगळीच कथा सांगत आहे. तबलीगी जमातचे मौलाना साद यांचा कथित ऑडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्यांनी कोरोनाचा उल्लेख करत मरायला मशिदीपेक्षा चांगली जागा कोणतीच असू शकत नाही. यावरुन हे स्पष्ट होत आहे की अशा कार्यक्रमामुळे कोरोनाचा धोका असल्याचे त्यांना आधीच माहित होते.

मरकज प्रमुख मौलाना साद व्हायरल ऑडिओमध्ये बर्‍याच गोष्टी बोलताना ऐकू येतात. यावेळी काही लोकांचा मागे खोकण्याचा आवाज देखील ऐकायला येत आहे. त्यावरुन असे दिसते की कोरोना तिथे आधीच पोहचला होता, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले गेले. ऑडिओमध्ये मौलाना साद हे असे बोलताना ऐकले जात आहे की मशिदीत जमून एखाद्या आजाराची वाढ होईल यावर विश्वास ठेवणे बेकार आहे, मी असे म्हणतो की जर तुम्ही पाहिले की एखादी व्यक्ति मशिदीत येऊन मरण पावली, तर त्याच्यासाठी मरण्यासाठी एवढे चांगले स्थान कुठेच असणार नाही आणि असूच शकत नाही.

कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये दिल्लीच्या निजामुद्दीन येथे तबलीगी जमातीच्या कार्यक्रमामुळे देशभरात एकच गोंधळ सुरू झाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यावर नाराजी व्यक्त करत या घटनेचा निषेध केला आहे.

व्हायरल ऑडिओमध्ये साद पुढे म्हणतात, अल्लाहवर विश्वास ठेवा, कुराण वाचत नाही वृत्तपत्र वाचतात आणि घाबरुन पळून जातात. साद पुढे म्हणतात की अल्लाह काही समस्या यासाठी आणतो की त्यावर आपला पाईक काय करतो हे पाहण्यासाठी. साद पुढे म्हणाले की जर कोणी म्हटले की मशिदी बंद कराव्यात, कुलूप लावावेत कारण यामुळे रोगाचा त्रास होईल, तर आपण ही कल्पना मनातून पहिली काढून टाकायला हवी.

Leave a Comment