कोरोना : एक विवाह सोहळा असा देखील…

देशभरातील लॉकडाऊनचा फटका अनेक गोष्टींना बसत आहेत. अनेक नियोजित कार्यक्रम देखील याकाळात रद्द करण्यात येत आहेत. या लॉकडाऊनचा परिणाम मध्य प्रदेशमधील इंदुर येथील अक्षय जैन यांच्या यांच्या मुलीच्या लग्नावर देखील पाहण्यास मिळाला.

अक्षय जैन यांची मुलगी किंजलचे लग्न 31 मार्चला करण्याचे ठरले. मात्र लॉकडाऊनमुळे एकत्र लग्न पुढे ढकलायचे अथवा शाहीसोहळा न करता छोट्या प्रमाणात लग्न लावून द्यावे, असे दोनच पर्याय जैन यांच्याकडे होते. अखेर जैन कुटुंबाने साध्या पध्दतीने मुलीचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला.

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी जैन कुटुंबियाने लग्नापुर्वीचे सर्व कार्यक्रम रद्द केले. इंदुरमधील 40 ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांने देखील आमंत्रण देण्यात आले होते. मात्र गर्दी टाळण्यासाठी त्यांनाही बोलवण्यात आले नाही. केवळ कुटुंबियातील निवडक सदस्यांच्या उपस्थित लग्न पार पडले.

Image Credited – NDTV

किंजल आणि वर दोघेही मुंबईत सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. दोघांनीही लग्नाच्या वेळी मास्क लावला होता. उपस्थित पाहुण्यांनी देखील यावेळी मास्क घातला होता. लग्नात त्यांनी फुलांच्या हाराऐवजी एकमेंकांना मोत्यांची माळ घातली.

उपस्थितांनी यावेळी सुरक्षेसाठी सॅनिटायझरचा वापर केला. तसेच फोटो काढताना देखील सोशल डिस्टेंसिंग पाळले.

Leave a Comment