इवांका ट्रम्प यांनाही आवडाला मोदींनी शेअर केलेला योगा व्हिडीओ, म्हणाल्या…

लॉकडाऊनच्या काळात लोकांना तंदुरुस्त राहण्यास प्रोत्साहित करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर योगासन व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओचे आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनी देखील कौतूक करत, या व्हिडीओ अप्रतिम म्हटले आहे.

मोदींनी योग निद्रेचा व्हिडीओ शेअर करत ट्विट केले होते की, जेव्हाही वेळ मिळतो, त्यावेळी मी आठवड्यातून एक-दोनदा योग निद्रेचा अभ्यास करतो. याद्वारे शरीर स्वस्थ आणि मन प्रसन्न राहते. सोबतच हे तणाव आणि चिंता देखील कमी करते.

इवांका ट्रम्प यांनी व्हिडीओ रिट्विट करत हे ‘अप्रतिम’ असल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपुर्वीच इवांका आपल्या वडिलांसोबत भारत दौऱ्यावर आल्या होत्या.

Leave a Comment