अमेरिकेसाठी धोक्याची घंटा! 24 तासांत 700 हून अधिक मृत्यू, तर 1.87 लाखांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त


नवी दिल्ली : चीन, इटली पाठोपाठ जगातील महासत्ता म्हणून ओळखण्यात येणाऱ्या अमेरिकेला कोरोनाने आपले केंद्र बनवले आहे. कोरोनाचा अमेरिकेत सुरु असलेला कहर काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. 1.87 लाखांवर अमेरिकेत कोरोना बाधितांची संख्या पोहोचली आहे. अमेरिकेत मागील 24 तासांमध्ये 700हून अधिक लोकांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेत कोरोनाच्या बळींची संख्या चीनपेक्षा जास्त झाली आहे.

व्हाइट हाऊसमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. त्यावेळी झालेल्या प्रेझेंटेशनमध्ये ‘अमेरिकेत जर वेळीच आवश्यक ती काळजी घेऊन उपाययोजना केल्या नाहीत, कोरोनाचा प्रसार रोखला नाही आणि आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला नाही तर अमेरिकेत 15 लाख ते 22 लाख लोक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडू शकतात. तसेच अमेरिकेतील कोरोना प्रादुर्भाव पाहता, जरी सर्व काळजी घेतली तरीदेखील 1 ते 2 लाख लोकांचा जीव जाऊ शकतो, असेही मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. याबाबत बोलताना हा आकडा कमीत कमी ठेवण्यासाठी देशात योग्य त्या उपाय योजना केल्या जात असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढिल 30 दिवस देशासाठी महत्त्वाचे असल्याचंही त्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment