हे आहेत देशातले कोरोना प्रसाराचे हॉटस्पॉट

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ज्या ठिकाणांवरून व्हायरस सर्वाधिक प्रसार झाला आहे, अशांना सरकारने हॉट स्पॉट म्हणून चिन्हांकित केले आहे. ज्या ठिकाणी सर्वाधिक कोरोनाग्रस्त सापडत आहे, अशा ठिकाणांना हॉट-स्पॉट समजण्यात आले आहे.

निझामुद्दीन – येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अनेकांना आयसोलेट करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला देश-विदेशातून हजारो लोक आले होते. आता पोलिसांनी संपुर्ण भागाला सील केले आहे.

भीलवाडा – राजस्थानच्या भीलवाडा येथील एका खाजगी हॉस्पिटलमधील 6 डॉक्टर आणि दुसऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. येथे करण्यात आलेल्या सर्वक्षणात अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

मुंबई – महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, सांगली या भागात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यात शेकडो जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

अहमदाबाद – कोरोनामुळे अहदमाबादमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. येथे व्हायरसची लागण आणि मृतांमध्ये मोठा फरक नाही. त्यामुळे प्रती शंभर व्यक्तींमागे एक व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मेरठ – दुबईवरून परतलेल्या एका व्यक्तीच्या कुटुंबातील 13 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. अनेकजण क्वारंटाईन झाले आहेत.

कासरगोड – केरळमधील कासरगोड येथे कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे व आकडा शंभरच्या जवळ आहे. यातील अधिकतर रुग्ण हे दुबईवरून परतलेले आहेत.

सरकार हॉट-स्पॉटद्वारे व्हायरसचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या भागात व्हायरसचा प्रसार अधिक आहे, तेथील 3 ते 5 किमी भागात नियमांचे पालन करण्याची सक्ती करण्यात आली आहे.

Leave a Comment