कोरोनावर मात करण्यासाठी बरे झालेल्या लोकांचे रक्त ठरू शकते मोठे शस्त्र

कोरोना व्हायरसशी लढणाऱ्या मानवाच्या रक्तातील प्लाज्मामध्ये असे अँटीबॉडी विकसित होऊ शकतात, जे व्हायरसला नष्ट करण्यासाठी नवीन हत्यार ठरू शकते. वैज्ञानिकांनी या आधारावर प्लाज्मा थेरेपी परिक्षण सुरू केले आहे.

या परिक्षणात कोव्हिड-19 आजारापासून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाज्मा काढून कोरोनाग्रस्तांना ठीक करण्यास वापरले जात आहे. अमेरिका आणि इंग्लंडमध्ये याचे परिक्षण सुरू झाले असून, चीनने दावा केला आहे की त्यांनी प्लाज्मा थेरेपीद्वारे रुग्णांना बरे केले आहे.

फेब्रुवारीमध्ये चीनच्या 20 नागरिकांनी प्लाज्मा दान केले होते, जे कोव्हिड-19 आजारातून बरे झाले होते. हे सर्व 20 लोक डॉक्टर आणि नर्स होते. चीनच्या संशोधकांनी दावा केला की गभीर रुग्णांवर या प्लाज्मा थेरेपीद्वारे 12 ते 24 तासात परिणाम दिसू लागला.

असे काम करते ?

या प्रक्रियेत हायपर-इम्युन लोकांची ओळख केली जाते. आजारातून बरे झालेल्या लोकांच्या प्लाज्माला कोन्वल्सेंट प्लाज्मा म्हटले जाते. रक्तातून हे प्लाज्मा वेगळे करण्यासाठी अपेरेसिस मशीनचा प्रयोग करण्यात आला आहे. या कोन्वल्सेंट प्लाज्माला गंभीररित्या आजारी रुग्णाच्या शरीरात ट्रांसफर केले जाते. याद्वारे आजारी व्यक्तीचे शरीर व्हायरसशी लढणारे अँटीबॉडी तयार करते.

या आधी देखील 1918-20 मध्ये स्पॅनिश फ्लू, 2005 मध्ये कोरोना व्हायरस-1, 2009 मध्ये एच1एन1 आणि 2014 मध्ये इबोलाच्या उपचारासाठी अशाच पद्धतीचा वापर करण्यात आला होता.

चीनने दावा केला आहे की या प्लाज्माद्वारे रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. तर ब्रिटन आणि अमेरिकेने याचे परिक्षण करण्यास सुरूवात केली आहे.

Leave a Comment