दिल्लीतील या कार्यक्रमामुळे देशभरात कोरोनाचा प्रसार

दिल्लीतील निझामुद्दीन येथील मरकजमध्ये आलेल्या लोकांद्वारे देशभरात कोरोना व्हायरसचा प्रसार होण्याची शक्यता आहे. अंदमान निकोबार येथील पहिला कोरोनाग्रस्त तबलीगी मरकजमध्ये उपस्थित होतो व तो देशातील 8 ठिकाणी थांबला होता.

या मरकजमध्ये हजारो लोक उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे व यातील अनेकांना संसर्ग होऊ शकतो. मरकजमध्ये सहभागी झालेले लोक तेथून उत्तरप्रदेश, गुजरात, तेलंगाना आणि तामिळनाडू येथील जमातमध्ये गेले होते. पुणे व पिंपरी चिंचवड येथील देखील अनेकजण दिल्लीतील या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर जमातमध्ये सहभागी झालेले लोक देशात कोठे-कोठे गेले होते, याची माहिती गोळा केली जात आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अंदमान निकोबर येथील पहिला कोरोनाग्रस्त 21 व 22 मार्च अथवा त्याआधी मरकजमध्ये थांबला होता. त्यानंतर तो दिल्लीसह देशातील 8 ठिकाणी थांबला होता. पोलिसांनी मरकजच्या आयोजकांना बोलवून सोशल डिस्टेंसिंग करण्यास देखील सांगितले होते. याशिवाय 25 मार्चला डब्ल्यूएचओच्या टीमने देखील क्वारंटाईन करण्यास सांगितले होते.

पोलीस अधिकाऱ्यांनुसार, आयोजकांनी काही लोक आजारी असल्याची माहिती लपवली होती. त्यांनी पोलिसांना कोणतीही सुचना दिली नव्हती. पोलिसांना काही लोक येथे खोकताना आढळल्यावर 27 मार्चला डब्ल्यूएचओच्या टीमला बोलवून लोकांचे स्क्रिनिंग करण्यास सांगितले. तेव्हा तबलीगी मरकजची माहिती समोर आली.

Leave a Comment